प.वि. पाटील विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२१ । केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालयात अखंड भारताचे जनक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या कार्याची चित्रफित ऑनलाइन पद्धतीने टाकण्यात आली. प्रसंगी उपशिक्षक योगेश भालेराव, कल्पना तायडे, सरला पाटील, दिपाली चौधरी, सूर्यकांत पाटील, धनश्री फालक, अशोक चौधरी, स्वाती पाटील, देवेंद्र चौधरी, सुनील नारखेडे, सुधीर वाणी आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज