सरस्वती विद्यामंदिर राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२२ । सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका कल्पना वसाने व माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका दिपाली देवरे यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. जिजाऊ वेशभूषा ऐश्वर्या बारी तर पार्थ जगताप याने वकृत्व सादर केले.विद्यार्थ्यांनी स्वत: हस्तेध्वज बनवून जय जिजाऊ जय शिवबाचा नारा दिला.

उपक्रमाचे आयोजन सुवर्णलता अडकमोल यांनी केले. सहकार्य नीलिमा भारंबे, सविता ठाकरे, सूदर्शन पाटील यांचे लाभले. मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील यांनी केले. संचालिका प्रतीक्षा पाटील मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थिती दिली.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -