fbpx

संत मिराबाई नगरात चिखलच चिखल

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । शहरातील पिंप्राळा परिसरातील संत मीराबाई नगरात एका व्यक्तीने घराचे बांधकाम करताना निघालेली काळी माती रस्त्यावर टाकली. दोन दिवसांपासून होत असलेल्या कमी अधिक पावसामुळे रस्त्यावर चिखलच चिखल झाला असून नागरिकांना वाट काढणे जिकरीचे झाले आहे.

मीराबाई नगरमध्ये एका घराचे बांधकाम सुरू झालेले असून त्या व्यक्तीने खोदकाम करताना निघालेली काळी माती रस्त्यावर आणून टाकली आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी मनपा प्रशासनाला बांधकाम विभाग व नगररचना विभागात तक्रार दिली असता त्यांनी उडवीची उत्तरे उत्तरे दिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तसेच या चिखलामुळे मिराबाई नगरमध्ये घंटागाडी देखील येत नाही. तरी मनपा प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt