राज्य पत्रकार संघाच्या अधिवेशनात‎ संजय चौधरी सन्मानित‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अधिवेशन नुकतेच ठाणे येथे पार पडले. त्यात एरंडोल येथील तालुकाध्यक्ष संजय नारायण चौधरी यांचा सन्मान करण्यात आला.

सविस्तर असे की,‎ मुंबई येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार ‎संघाचे सोळावे राज्यस्तरीय अधिवेशन ‎ठाणे येथील गडकरी रंगायातन‎ सभागृहात प्रदेशाध्यक्ष वसंत‎ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.‎ या अधिवेशनात एरंडोल तालुक्यातील ‎संघाचे तालुकाध्यक्ष संजय नारायण‎ चौधरी यांना कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात‎ आले.‎ यावेळी अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रिय‎ गृहराज्यमंत्री कपिल पाटील यांच्या‎ हस्ते झाले.

अधिवेशनात मराठी पत्रकार‎ संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,‎ सरचिटणीस विश्वासराव आरोटे,‎ पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील,‎ धडक कामगार युनियनचे अध्यक्ष‎ अभिजीत राणे, कार्याध्यक्ष राकेश‎ टोळ्ये, मनिष केत, नितीन जाधव,‎ किशोर पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष‎ प्रवीण सपकाळे, खान्देश विभाग प्रमुख‎ किशोर रायसाकडा, कोकण विभागीय‎ अध्यक्ष नितीन शिंदे यांच्यासह सर्व‎ विभागीय अध्यक्ष व राज्यातील‎ पाचशेपेक्षा जास्त पत्रकार उपस्थित‎ होते. यावेळी एरंडोल संघाचे‎ तालुकाध्यक्ष संजय चौधरी यांनी‎ कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट‎ कार्याबद्दल तसेच एरंडोल ग्रामीण‎ रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर‎ आमदार चिमणराव पाटील यांच्या‎ प्रतिनिधी म्हणून सदस्यपदी नियुक्ती‎ झाल्याबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री‎ कपिल पाटील यांच्या हस्ते सन्मानित‎ करण्यात आले.

यावेळी मराठी‎ पत्रकार संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष‎ दीपक सपकाळे, कमलेश देवरे,‎ जगदीश सोनवणे, ज्ञानेश्वर गुरव,‎ भूषण महाजन, चेतन निंबोळकर,‎ विकी खोकरे, विलास ताठे, संतोष‎ नवले, योगेश सैतवाल, राहुल इंगळे,‎ नागराज पाटील आदी उपस्थित.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar