पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या वाढदिवसानिमित्त फ्रंटलाईन वर्कर्सना सॅनिटायझर वाटप

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ । खासदार श्रीकांत शिंदे, मंगेश चिवटे, जितेद्र सातव यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व रेडप्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फ्रंटलाईन वर्कसला सॅनिटाइझर वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, जळगाव शहर समन्वयक जितेंद्र गवळी, भावेश ढाके, रेडप्लस ब्लड बँकेचे चेअरमन डॉ. मोईज देशपांडे, भरत गायकवाड, अख्तर अली सय्यद व रूग्णसेवक दिपक घ्यार, चेतन परदेशी, अनिल पवार, विशाल निकम, अतुल धनगर आदींची उपस्थिती होती.

या फ्रंटलाईन वर्कर्सच्या मुख्यालयात सॅनिटाइझर दिले भेट

पोलीस अधीक्षक कार्यालय, रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलीस स्टेशन, अँब्यलेन्स चालक व सहकारी, शासकीय महिला रूग्णालय मोहाडी, जळगाव, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय जळगाव आणि चौका- चौकात बंदोबस्तावर असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी, पोलीस व होमगार्ड आदी व शासकीय कार्यालयांत सेनिटाईझरच्या बॉटल्स असलेले बॉक्सचे वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वंदनिय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि रेडप्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने सेनिटाईझरच्या बॉटल असलेले बॉक्स भेट देण्यात आले.

शासकीय महिला रूग्णालय मोहाडी येथे रूग्णांनाही सुरक्षास्तव सॅनिटाइझर देण्यात आले. कोविडचा प्रादुर्भाव जरी आवाक्यात आलेला असला तरी कोरोना विषाणू ची पुन्हा लाट येऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोविडचा प्रादुर्भाव पुर्णपणे कमी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने वंदनिय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडुन हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -