एरंडोलात साने गुरुजी जयंती उत्साहात

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । एरंडोल येथील दि.श. पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पूज्य साने गुरुजी यांचा जन्मदिवस संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य येणे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील यांनी साने गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळेस मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक एटीची मकर व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

दरम्यान, अमित पाटील यांनी साने गुरुजींच्या जीवनाविषयी व त्यांच्या साहित्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य येणे पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले मराठी विभाग प्रमुख एटी चमकार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व श्यामची आई या पुस्तकातील आशय व कथानक त्यांनी उपस्थित सर्वांसमोर सादर केले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -