टी.डी.एफ संघटनेच्या राज्य खजिनदारपदी संदीप घोरपडे यांची निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । पूज्य साने गुरुजी विदया प्रसारक मंडळांचे सचिव संदीप बाबुराव घोरपडे यांची टी.डी.एफ संघटनेच्या राज्य खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल प्रगती शिक्षक सेनातर्फे सत्कार करण्यात आला.

राजकारण न करता फक्त समाजकारण करुन गोर गरिबांच्या व तळागळातल्या विद्यार्थी व लोकांची मदत करणारे पूज्य साने गुरुजी यांचा वसा टिकवून ठेवणारे पूज्य साने गुरुजी विदया प्रसारक मंडळांचे सचिव संदीप बाबुराव घोरपडे यांची टी.डी.एफ संघटनेच्या राज्य खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रगती शिक्षक सेनाचे अध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील, साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, बन्सीलाल भागवत, राजेंद्र सांळुखे, योगेश सनेर, संजीव पाटील, गोकुळ सांळुखे, दिलीप सोनवणे, राजेंद्र सोनवणे, धनजय सुर्यवंशी, संदीप वाघ, नामदेव आहिरे, अशोक ईसे, संजय पाटील, दिपक भामरे, जितेंद्र शेटे, धिरज पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज