मन्यारखेडा फाट्याजवळ वाळू डंपर-ट्रकची धडक

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे डंपर व ट्रकमध्ये धडक झाल्याची घटना जळगाव-भुसावळ महामार्गावरील मन्यारखेडा फाट्याजवळ बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, नशिराबाद पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतरही काहीच कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जळगाव-भुसावळ महामार्गावरील मन्यारखेडा फाट्याजवळ बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास ट्रक आणि डंपरची धडकी झाली. यामुळे डंपरमधील वाळू रस्त्यावर विखुरली होती. अपघात झाल्यानंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत आठ ते दहा चारचाकी गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी देखील झाली हाेती. काही वेळाने नशिराबाद पोलिस ठाण्याचे पथकही घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आल्या. अपघातात कोण जखमी झाले याची माहिती मात्र मिळू शकली नाही. दोन्ही वाहनांच्या धडकेत डंपरमधून अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले होते.

मात्र, त्यानंतरही नशिराबाद किंवा एमआयडीसी पोलिसात उशिरापर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. दररोज मध्यरात्री या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असते. मात्र कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज