चक्क पोलीस ठाण्यातूनच लांबविले वाळूचे डंपर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । भडगाव येथे तलाठ्याला मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. वाळूमाफियांची मुजोरी वाढतच असून डंपर चोरी करण्यात आले आहे. चक्क कासोदा पोलीस ठाण्यातूनच.

१९ डिसेंबर रोजी मध्यरात्री एक वाजता कासोदा (ता. एरंडोल) येथील फरकांडे चौफुलीवर पोलिसांनी एमएच- २०, सीटी- ९२८४ हे डंपर अडवले. डंपरमध्ये तीन ब्रास वाळू होती. तर चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. ही वाळू गिरणा नदीतून चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी डंपरचालक गगन छगन तडवी (रा. उत्राण) याच्यासह डंपर ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. डंपर‎ जप्त करून तडवी याच्याविरुद्ध‎ गुन्हा दाखल करण्याची कारवाई‎ सुरू असतानाच तडवीचा‎ सहकारी अमीन हुसेन शेख‎ (रा.उत्राण) हा पोलिस ठाण्यात‎ आला. त्याने मुजोरी दाखवत थेट‎ पोलिस ठाण्यातून डंपर पळवून‎ नेला.

डंपरमधील वाळू तळई‎ रोडवरील सत्कार हॉटेलच्या‎ समोरील बेकरीच्या मागे खाली‎ केली. यानंतर डंपर सोडून पळून‎ गेला. या घटनेत ही थेट पोलिस‎ ठाण्यातून डंपर पळवण्यापर्यंत‎ माफियांनी मुजाेरी केली. या‎ प्रकरणी दोघांविरुद्ध कासोदा‎ पाेलिसांत गुन्हा दाखल झाला‎ अाहे. उपनिरीक्षक नरेश ठाकरे‎ तपास करत आहेत.‎

हेही वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -