अशाेक राठाेड यांना समाजरत्न पुरस्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ ।  सामाजिक, शैक्षणिक कार्यात कार्य करणारे तसेच ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड यांची भागीरथी भोईर प्रतिष्ठानतर्फे समाजरत्न पुरस्काराकरिता निवड करण्यात आली आहे.

सविस्तर असे की, पक्षीमित्र, वृक्षमित्र, पर्यावरण स्नेही अशी ओळख निर्माण करणारे तसेच सामाजिक, शैक्षणिक कार्यात कार्य करणाऱ्या अशोक राठोड यांच्या कार्याची चिंचघर वाडा ( जि.पालघर ) येथील सेवाभावी संस्था भागीरथी भोईर प्रतिष्ठानने दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. यासंदर्भात नुकतेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश भोईर यांच्यातर्फे अशाेक राठाेड यांना निवड पत्र देण्यात आले. अशोक राठोड यांनी पक्ष्यांसाठी पाणपोईचे गावोगावी वाटप, मतदान व स्वच्छतेबाबत जनजागृती, रक्तदान शिबिरांचे आयोजन ही केले आहेत. यासह त्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. राठोड यांना साहित्य क्षेत्रात रस असून,त्यांचे अनेक विषयांवरील लेख प्रसिद्ध आहेत.

काेराेना काळात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून त्यांनी ‘गच्चीवरची शाळा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला हाेता. त्यांच्या या उपक्रमाचे राज्यभर कौतुक झाले होते. अशा विविध कार्याची दखल घेऊन भागीरथी प्रतिष्ठानमार्फत त्यांची पुरस्काराकरिता निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज