⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | वर्डी गावात रंगणार समर्थ सद्गुरु सुखनाथ बाबांचा समाधी संजीवन सोहळा

वर्डी गावात रंगणार समर्थ सद्गुरु सुखनाथ बाबांचा समाधी संजीवन सोहळा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । चोपडा शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर सातपुडाच्या पायथ्याशी वसलेल्या वर्डी गावात धुलिवंदनेच्या दिवशी समर्थ सद्गुरु सुखनाथ बाबा यांचा समाधी संजीवन सोहळा दर वर्षी पार पडत असतो. यंदाही येथील गावकरी बाबांची ८७ वी पुण्यतिथि साजरी करणार आहेत.

गावची एकता व अखंडता ही आदर्श घेण्या योग्य आहे. कधी काळी मोजक्या लोकांच्या उपस्थीत सुरु झालेला हा उत्सव आता लाखो लोकांच्या उपस्थितित पार पडतो. सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातील भाविकही हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतात. उत्सवाच्या तयारीसाठी १ महिन्या पासुन गावातील शेकळो हात ह्या कामाला राबतात. गावातील मंडळी अगदी गोळी गोविंदाने बाबांच्या ह्या उत्सवात सामिल होतात. विशेष सांगायचे म्हणजे वरण, बंट्टी व वांग्याची भाजी अश्या महाप्रसादासाठी १५० क्विंटल गेहु, २५ क्विंटल तुर दाळ आणी ६० ते ६५ क्विंटल वांगे असतात. ही सगळी सामग्री गावातुनच जमा केली जाते.

होळीच्या दिवशी होलिका दहन करुन बाबांच्या आरतीला सुरुवात होते. त्यानंतर मंदीर परिसरात पिठ मळुन बंट्टी बनवायला सुरुवात होते. ह्यासाठी गावतल्या स्त्रीया प्रमुख्याने सहभाग घेतात. रात्री 2 ते 3 वाजे पर्यंत ही प्रकिया सुरु असते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलिवंदनेच्या दिवशी सकाळी ६ वाजता बाबांची आरती होते. ८ वाजे पासुन बाबांच्या वस्त्रांची गावात वाजत गाजत मिरवणुक काढली जाते. १० वाजता समाधी अभिषेक करुन दुपारी १२ वाजता महाआरती केली जाते. बाबांना नैवैद्य दाखवल्यावर सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप केला जातो. उत्सवात सुमारे लाख दिड लाख भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. संध्याकाळी ७ वाजता आरती करुन बाबांच्या पालखीची मिरवणुक गावात काढली जाते. भजनांच्या गजरात सारी भाविक भक्त आनंदाने नाचतात. २० हजार लोकवस्तीच्या गावात एवढा भला मोठा उत्सव असतांना तिळ मात्र ही वाद होत नाही ही बाब प्रशंसनीय आहे. पालखी मिरवणुकीत गावाची तरुणाई कोण्या विदेशी गीतांवर नव्हे तर बाबांच्या स्वरचित भजनांनवर ताल धरत अगदी मनसोक्त पणे नाचत असते. हा आदर्श हा एकोप्याचा संदेश सर्वांनी घेण्या योग्य आहे.

परंपरा टीकवत साजरा होतो उत्सव

धुलिवंदनेच्या दिवशी फाल्गुन वद्य पाडव्याला म्हणजेच दि.२०/३/१९३५ ला बाबांनी जिवंत समाधी घेतली. त्या निमीत्त गावात हा चैतन्य महोत्सव पार पडत असतो. बाबांचे शिष्य गुरु रेवानंद स्वामी महाराज यांनी एक विचार घेउन ह्या उत्सवाची सुरुवात केली होती. तो समाज एकरुप करण्याचा विचार घेउन आजही ही परंपरा दरबाराचे मठाधिपती दिनानाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नित्य नेमाने सुरु आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह