fbpx

कर्जबाजारीपणाला कंटाळून सलून व्यावसायिकाची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जुलै २०२१ । कर्जबाजारीला कंटाळून सलून व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी जळगावातील लक्ष्मीनगरात उघडकीस आली आहे. गजानन कडू वाघ (वय-३५) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. दरम्यान याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबबत असे की, गजानन वाघ हा जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथील रहिवाशी असून तो सध्या नोकरीच्या निमित्ताने जळगावातील लक्ष्मीनगर येथे भाड्याच्या घरात गेल्या काही वर्षांपासून पत्नी सरला व दोन मुलांसह राहतो. सलून दुकानावर सलुनचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान, कोरोना लॉकडाऊनमुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्या समोर ठाकला होता. सुरूवातीच्या काळात सुलन दुकानादारांकडून काही प्रमाणात मदत मिळाली. परंतु, नंतर लॉकडाऊन वाढतच गेल्यामुळे वाघ यांची आर्थिक परिस्थिती पुर्णपणे ढासाळली. याला कंटाळून राहत्या घरात मध्यरात्री दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धटना आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. 

भाऊ ईश्वर वाघ याने मृतदेह खाली उतरवून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय  सोनवणे यांनी मृत घोषीत केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयताच्या गजाननच्या पश्चात आई लताबाई, पत्नी सरला, ईश्वर आणि रामेश्वर दोन भाऊ,  मुलगा ऋषीकेश (वय ५) व मुलगी वैष्णवी (वय ३) असा परिवार आहे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज