हेरॉईन माफिया सलीमखानला पोलीस कोठडी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । मध्यप्रदेशातील मंदसौर येथील अंमली पदार्थांचा माफिया असलेला सलीमखान शेख बहादूर खान (६५) याला सोमवारी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात न्या.व्ही.बी.बोहरा यांच्या न्यायालयात हजर केले असता २४ डिसेंबर पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

त्यास रविवारी पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली होती. रावेर येथे बन्हऱ्हाणपूर येथील अख्तरीबानोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ कोटीच्या हेरॉईनसह पकडले होते. त्यानंतर लगेचच मुख्य सूत्रधार सलीमखानला पकडण्यात आले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -