लोटगाडीवर दारू विक्री; व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ ।  महामार्गावरील गुजराल पेट्रोलपंपानजीकच्या चौकात अंडापावच्या हातगाडीवर मद्यविक्री करणाऱ्या वाईन शॉप व्यवस्थापकासह तिघांवर सोमवारी जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हातगाडीही जप्त करण्यात आली आहे.

पूनमसिंग फुलसिंग पाटील ( रा. कंडारी, ता. भुसावळ ), योगेश कैलास चौधरी व विवेक अनिल भोई ( दोन्ही रा. पिंप्राळा ) असे गुन्हा झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

गुजराल पेट्रोलपंपाजवळ वाईनशॉपवरील व्यवस्थापकाने वाईन शॉपच्यासमोर दारु पिण्यास नागरिकांना परवानगी दिली.

तसेच हातगाडीवरही दारुविक्री होत असल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामदास वाकोडे यांनी स्वतः फिर्यादी होवून व्यवस्थापक पुनमसिंग पाटील, हातगाडीवर दारु विक्री करणारा योगेश चौधरी व विवेक अनिल दोन्ही या तीन जणांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज