fbpx

साकळीचा मुख्य रस्ता गेला पाण्याखाली

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२१ । यावल तालुक्यातील साकळी गावापासून ते साकळी फाटयादरम्यान रस्त्यावर पावसाचे पाणी तुंबत असल्याने पाण्याची  कायमस्वरुपी समस्या सोडविण्या यावी अन्यथा समस्या न सुटल्यास तिव्र आदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मिलींद जंजाळे यांनी दिलेला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, साकळी गावासह परिसरातील नागरिकांना बाहेरगावी ये-जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. हा एकमेव मुख्य रस्ता असताना या रात्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात खोलगट भागात दोन ते अडीच फुटांपर्यत पाणी साचते. 

अशा परिस्थितीत साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना अडचणींचा सामना करावं लागत. तुंबलेल्या पाण्यातून वाहने नेताना चालकांची दमछाक होते. 

हा प्रश्न सोडविण्यासाठी सकाळी ग्रामपंचायत प्रशासनाने संबधित विभागाकडे दुरुस्तीचा पाठपुरावा करा, अशी मागणी श्री जंजाळे यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रति यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, तहसीलदार गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज