सागर पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२१ । राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, राजपूत करणी सेना आणि गौरी उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२०-२१ च्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात येथील सु.ग. देवकर प्रायमरी स्कूलचे उपक्रमशील शिक्षक सागर पाटील यांना पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

सविस्तर असे कि, जळगाव येथील सु.ग. देवकर प्रायमरी स्कूलचे उपक्रमशील शिक्षक सागर पाटील यांना  राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था,  राजपूत करणी सेना आणि गौरी उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०२०—२१ च्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन त्यांनी विविध उपक्रम शालेय स्तरावर राबवले आहेत . सागर पाटील सर हे शिक्षक आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर या आघाडीत महानगर सरचिटणीस तर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन या संघटनेत जळगाव तालुका उपाध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहेत.
हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

यांची उपस्थिती होती

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मीनाक्षी चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून, गणेश अमृतकर, संदीपा वाघ, विलाससिंग पाटील, बी.एच.खंडाळकर, सुमित पाटील, ज्ञानेश्वर वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज