प्रवाशांनो लक्ष द्या : सचखंड एक्स्प्रेस अमृतसर ऐवजी ‘या’ स्टेशनपर्यंत जाणार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२१ । पंजाब राज्यात सुरू असलेल्या किसान आंदोलनामुळे नांदेड-अमृतसर संचखंड एक्स्प्रेस ही गाडी शॅार्ट टर्मिनेट केली आहे. त्यानुसार ही गाडी केवळ नांदेड ते चंदीगडपर्यत चालवली जात आहे.

तसेच अमृतसर येथून सुटणारी सचखंड एक्स्प्रेस ही गाडी बुधवारी (दि.२५) रद्द आहे. त्यामुळे ही गाडी गुरूवारी भुसावळ विभागात येणार नाही. परिणामी प्रवाशांनी या गाडीची काढलेली तिकिटे आपोआप रद्द झाली आहे, असे प्रशासनाने कळवले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -