fbpx

सचिन पाटील यांची मनपाच्या प्रभाग क्रमांक १ च्या सभापतीपदी निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२१ । मनपाच्या प्रभाग क्रमांक १ च्या सभापतीपदी सचिन पाटील यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड नगरसचिव अनिल गोराणे उपस्थित होते.

जळगाव महापालिकेच्या चार प्रभाग समितीच्या सभापतींची निवड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक १ साठी भाजपा फुटीर गटाचे सचिन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज