एस.टी. कर्मचाऱ्याचे ७ व्या दिवशीही उपोषण सुरुच

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२१ । शैलेश नन्नवरे यांचे निलंबन रद्द करून तात्काळ कामावर घेण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेतर्फे साखळी उपोषण पुकारण्यात आले असून रविवारी सातव्या दिवशीही संघटनेचे उपोषण सुरूच होते.

जळगाव आगाराचे कर्मचारी शैलेश नन्नवरे यांचे निलंबन रद्द करून त्यांना तात्काळ कामावर घेण्यात यावे व सहाय्यक वाहतूक अधीक्षक मनोज तिवारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागण्यासाठी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेतर्फे जळगाव आगारासमोर साखळी उपोषण पुकारण्यात आले आहे. गेल्या सात दिवसांपासून हे उपोषण सुरूच असून आगार प्रशासनातर्फे उपोषणाची साधी दखलही घेण्यात आलेली नसल्याचे जळगाव आगाराचे कर्मचारी तथा कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव शैलेश नन्नवरे यांच्याकडून सांगण्यात आले.

महामंडळाच्या उपाध्यक्षांना दिले निवेदन 

या प्रकरणाची चौकशी मध्यवर्ती कार्यलयाकडून चौकशी अधिकार नेमून करावी व श्री. नन्नवरे यांना न्याय मिळावा, या प्रकरणी दोषी असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना आपल्यामार्फत न्याय मिळावा अशी मागणी, संघटनेतर्फे राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना ई-मेल व पोस्टाद्वारे पाठविण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज