एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाला भारतीय मजदूर संघाचा पाठिंबा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । एस.टी. महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करावे, यासह विविध मागण्यांसाठी पाचोरा आगारातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष पी.जे. पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत संपाला पाठिंबा जाहीर केला.

पाचोरा आगारातील एस.टी. महामंडळ कर्मचाऱ्यांकडून एस.टी. महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणींसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. दरम्यान, या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष पी.जे. पाटील, नगरपालिका, महानगरपालिका महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष धनराज पाटील यांनी भेट घेऊन संपास पाठींबा दिला. भारतीय मजदूर संघ प्रणीत महाराष्ट्र मोटार कामगार संघ ही संघटना एस.टी. महामंडळातच असून सुरवातीपासुनच संपात सहभागी असल्याची सांगून ही संघटना संपात सहभागी असल्याचे पी.जे.पाटील यांनी सांगितले.

त्वरित निर्णय घेण्यात यावा
यावेळी बोलतांना पी.जे. पाटील यांनी, शासनाने अधिक काळ मागणी लांबवून न-धरता कामगारांच्या न्यायीक मागणीस मान्यता देवून त्वरित निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त करून उपोषणास जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाल्यास यास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असे मतही व्यक्त केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज