एस.टी.ची वाहतूक ठप्प अन् खाजगी वाहनचालकांची भाडे वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२१ । राज्य परीवहन महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करून, कर्मचार्‍यांना राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे सोई, सवलती, वेतन, भत्ते नियमाप्रमाणे लागू करण्यात यावे, या मागणीसाठी एस.टी.कर्मचार्‍यांनी संपाची हाक दिली आहे. यात जिल्ह्यातील बहुतांश आगारातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यामुळे एस.टी.ची वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र, या संधीचा फायदा घेत खाजगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट सुरु आहे. यावल, फैजपूर, सावदा, रावेर या मार्गावरील वाहनचालकांनी तब्बल २० रुपये भाडेवाढ केली. यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सणावाराच्या दिवसात अचानक संप केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटी बस बंद असल्याने प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. राज्यव्यापी संपात जिल्ह्यातील आगारातील २६४ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बस फेऱ्या रद्द आहेत. साऱ्या बस एकाच ठिकाणी लावल्या आहेत. नागरिक हा संप कधी थांबेल याचीच वाट पहात आहेत.

मात्र, याच संधीचा फायदा घेत खाजगी वाहनचालकांनी भाडे वाढ केलीय. यावल, फैजपूर, सावदा, रावेर या मार्गावरील वाहनचालकांनी तब्बल २० रुपये भाडेवाढ केली. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी पुकारलेला संप जरी याेग्य असला, तरी अचानक केलेल्या संपामुळे प्रवासी वेठीस धरले गेले आहेत.

वाढीव खासगी प्रवासभाडे

भुसावळ- यावल ४०-५०
भुसावळ-मुक्ताईनगर ५०
भुसावळ-जळगाव ५०
भुसावळ-सावदा ४० -५०
भुसावळ-वरणगाव ३०
भुसावळ-फैजपूर ५०

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज