fbpx

पाचोऱ्यात लसीकरणासाठी नागरिकांच्या ऐवजी दगडाची रांग

कंटाळलेले नागरिकांनी स्वतः उभे न राहता नंबरसाठी दगडे ठेवली

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ मे २०२१ । पाचोरा शहारात गेल्या हफ्त्याभरापासून लसीकरण बंद आहे. नागरिक हफ्त्याभरापासून रोज सकाळी 6,7 वाजेपासून येऊन बसत आहे. पण त्यांन लस मिळत नाही आहे. यात काही लोक पाहिला तर दुसरासाठी प्रतीक्षा करत आहे.

आज पासून 3 मे पासून बऱ्याच देशात बऱ्याच ठिकाणी 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु झाले आहे तसेस देशातील तरुण वर्गाने लस मिळेल. या आशेने लसीकरणासाठी नोंदणी देखील केली. पण तरुण वर्गाची मात्र निराशा झाली आहे. पाचोरा शहारात नागरिकांनचा हफ्त्याभरापासून रोज येऊन येऊन कंटाळून शेवटी आपल्या जागेवर दगडे ठेऊन एका जागेवर सावलीत बसले आहे त्यात उन्हाची दाहकता देखील वाढली आहे.

पाचोरा ग्रामीण रुग्णालय प्रशासन मात्र लसीचा पुरवठा नसल्या कारणाने हतबल आहे. आम्हला पण नागरिकांची काळजी आहे. पण लसीची पूर्तता नसल्यामुळे आम्ही ही काही करू शकत नाही. नागरिकांनी लसीकरणदरम्यान स्वतःची काळजी घ्यावी आणि लस उपलब्ध असेल तरच यावे अशी विनंती केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज