रोटरी क्लब गोल्डसिटीचा प्रांतपाल मेहेर यांच्याकडून गौरव

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ ।  डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल रमेश मेहेर (नाशिक) यांनी जळगावला भेट देत रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीच्या विविध प्रकल्पाचा गौरव केला. यावेळी कार्यक्रमास व्यासपीठावर सहप्रांतपाल विष्णू भंगाळे, अध्यक्ष उमंग मेहता, मानद सचिव डॉ. नीरज अग्रवाल यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम गणपती नगरात रोटरी हॉलमध्ये पार पडला.

दरम्यान, मानद सचिव डॉ. नीरज अग्रवाल यांनी सचिवांचा अहवाल सादर केला. या कार्यक्रमात रोटरॅक्ट क्लबची स्थापना करून अध्यक्ष राज जोगदंड, सचिव सोहेल पठाण, तनय गिल कोषाध्यक्ष यश बांगड, शैलेश डोके यांचा सत्कार करण्यात आला. तसेच क्लब बुलेटीनचे प्रकाशन करण्यात आले. रोटरी फाउंडेशनला देणगी देणाऱ्या डॉ. सुर्यकिरण वाघण्णा, काजल मेहता, पंकज काबरा, अमित भुतडा, धीरज अग्रवाल यांना पॉल हरिस फैलो सन्मान प्रांतपालांच्याहस्ते देण्यात आला.

यावेळी सहप्रांतपाल डॉ. गोविंद मंत्री, गोल्डसिटीचे माजी अध्यक्ष नंदू आडवाणी, सतीश मंडोरा, नीलेश जैन, प्रिती मंडोरा, अभिषेक अग्रवाल, प्रखर मेहता, विनायक बाल्दी, सुनील आडवाणी, सदस्य राहूल कोठारी, राकेश सोनी, निखील चौधरी यांच्यासह सर्व सदस्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar