रोटरी क्लबतर्फे १८ महिला शिक्षिकांचा गौरव

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । जळगाव येथील रोटरी क्लबतर्फे नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून १८ महिला शिक्षिकांना ‘नेशन बिल्डर ॲवार्ड’ प्रदान करुन गौरविण्यात आले. गणपती नगरातील रोटरी हॉल येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी डी.एन. देवांग यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, अध्यक्ष संदीप शर्मा, मानद सचिव मनोज जोशी उपस्थित होते. राष्ट्र निर्मितीती सर्व घटकांचे योगदान असते आणि त्या सर्व घटकांना घडविण्याचे महत्त्वाचे काम शिक्षक करीत असतात, असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी देवांग यांनी यावेळी केले. माजी प्रांतपाल डॉ. सिकची यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात सरस्वती वंदना आणि स्वागत गीत ज्योती राणे यांनी सादर केले. आशा पाटील, पुनम बोंडे, मोनीका चौधरी या सत्कारार्थी शिक्षिकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तुषार फिरके यांनी तर सूत्रसंचालन सी.डी. पाटील यांनी केले. आभार ॲड. केदारनाथ मुंदडा यांनी मानले. माजी अध्यक्ष डॉ. जयंत जहागीरदार, कॅप्टन मोहन कुलकर्णी, जितेंद्र ढाके, डॉ. काजल फिरके, स्वाती ढाके आदी कार्यक्रमास उपस्थित होते.

यांना मिळाला पुरस्कार
कार्यक्रमात आशा पाटील (जिजामाता विद्यालय), राजश्री पगार (या.दे.पाटील विद्यालय), आकांक्षा निकम (बारी मा. विद्यालय), ज्योती पाटील (जयदूर्गा विद्यालय), सपना रावलांनी (आदर्श सिंधी हायस्कूल), सोनाली साळुंखे (कन्या शाळा, नशिराबाद), अरुणा नेहते (जि.प.शाळा, नशिराबाद पेठ), छाया पाटील (प्रतिभा विद्यालय), लीना आहिरे (प्राथमिक शाळा, कन्हाळे भुसावळ), कांचन पाटील (गुळवे विद्यालय), विद्या खाचणे (सार्वजनिक विद्यालय, असोदा), ज्योती पवार (आदर्श विद्यालय कानळदा), चारूलता पाटील (नंदिनीबाई विद्यालय), ज्योती गोसावी (का.ऊ.कोल्हे विद्यालय), पूनम बोंडे (गांधी विद्यालय, भादली), ज्योती राणे (जि.प. प्रा.शाळा, साळवा), मोनिका चौधरी (जि.प. प्रा. विद्यामंदिर, वडली) व जयश्री नेहते (ला.ना.विद्यालय) आदी शिक्षिकांना ‘नेशन बिल्डर ॲवार्ड’ने गौरविण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज