fbpx

साने गुरुजी यांच्या पुण्यतिथी दिनी रोटरी क्लबतर्फे १२५ पुस्तकांचे वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२१ । महाराष्ट्राचे वैभव असलेल्या पूज्य साने गुरुजी यांच्या पुण्यतिथी या दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब जळगाव मीडटाऊनतर्फे  कचरा वेचणाऱ्या मुलांच्या शाळेला लायब्ररीसाठी 125 पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यात मुख्यता प्रेरणादायीकथा, गाणी, गोष्टी व शैक्षणिक पुस्तके देण्यात आली.  वर्धिष्णू या संस्थेतर्फे ही शाळा चालवली जाते.

या उपक्रमास आर्थिक योगदान रो.शेखर प्रभुदेसाई, डॉक्टर अपर्णा मकासरे, डॉक्टर रवी महाजन यांनी केले.

वर्धिष्णू या संस्थेचे अध्यक्ष अद्वैत दंडवते व प्रणाली दंडवते यांनी या उपक्रमाबद्दल सर्व दात्यांचे व क्लबचे देखील आभार मानले. या कार्यक्रमास डॉ. अपर्णा मकासरे, अनिल एम अग्रवाल, शंकर भाई पटेल, डॉ. विवेक वडजी कर, तारीख शेख, अनिल डी अग्रवाल, सचिव शशी अग्रवाल, अध्यक्ष डॉ. रेखा महाजन इत्यादी सदस्यांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज