रोहिणी खडसे यांना ‘वुमन लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार तर जेडीसीसी बँक ठरली ‘बेस्ट डिजीटल बँक’

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतांना बँकेला सहकार क्षेत्रातील अतिशय मानाचे दोन पुरस्कार मिळाल्याने, बँकेच्या यशस्वी वाटचालीला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. तर जे.डी.सी.सी.बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांना ‘वुमन लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँकींग समिट आणि फ्रंटीयर्स इन को-ऑपरेटीव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी  पुरस्कार  सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्या दरम्यान डिजिटल क्षेत्रात अग्रेसर राहून मान पटकावला आहे. म्हणून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ‘बेस्ट डिजीटल बँक’ पुरस्कार प्रदान करू सन्मानित करण्यात आले आहे. तसेच जे.डी.सी.सी.बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांना ‘वुमन लीडर ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

एकीकडे बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे बेस्ट डिजिटल बँक हा पुरस्कार जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पटकावला आहे. तर दुसरीकडे जे.डी.सी.सी.बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे ‘वुमन लीडर ऑफ द इयर’ या पुरस्काराच्या मांकरीउ ठरल्या आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज