fbpx

ऍड.रोहिणी खडसेंचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२१ । विधानसभेत गैरवर्तन केल्याने १२ आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा फार गाजत असून भाजपकडून राज्यभर आंदोलने केली जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड.रोहिणी खडसे यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आहे. खडसे यांनी ट्वीट करीत टोमणा लगावला आहे.

गेल्या काही दिवसापासून ऍड.रोहिणी खडसे ट्वीटरवर बऱ्याच सक्रिय झाल्या असून दररोज भाजपला टार्गेट करीत आहे. मंगळवारी रोहिणी खडसे यांनी पुन्हा ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांना टोमणा लगावला आहे. ‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? सभागृहात न जाता बाहेर शो बाजी करून काय मिळवाल अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज