जळगाव लाईव्ह न्यूज । विरोधकांनी ॲड. रोहिणीताई खडसे यांच्यावर कितीही टिका केली तरी त्या निश्चितच विजयी होतील, असा विश्र्वास बोदवड बाजार समिती संचालक तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे यांनी व्यक्त केला.
ॲड. रोहिणीताई खडसे यांचा राजकारणात प्रवेश झाल्यानंतर त्यांनी स्व कर्तृत्वातून आपल्याला मिळालेल्या पदांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांची सुरुवात मुक्ताईनगर तालुक्यात आदिशक्ती मुक्ताई सह सूतगिरणी चेअरमन म्हणून झाली. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत जेव्हा भाजपने मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात एकनाथराव खडसे यांना उमेदवारी नाकारली तेव्हा त्यांचेजागी ॲड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. काही कारणांनी ॲड. रोहिणी खडसे यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता.
परंतु रोहिणी खडसे यांनी पराभवा नंतर खचून न जाता निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून जिद्दीने कामाला लागल्या. त्यावेळी सुद्धा मतदारसंघात ॲड. रोहिणी खडसे या आ एकनाथराव खडसे कन्या असल्यामुळेच त्यांना आयते व्यासपीठ मिळाले अशी घराणेशाहीची टिका विरोधकांकडून करण्यात आली. परंतु त्यांनी या टिकेला न जुमानता मतदारसंघात समाजातील शेवटच्या घटका पर्यंत त्या गेल्या, त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेतल्या, त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तालुका पातळीवरून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करण्याची त्यांची तयारी असते.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष झाल्या नंतर रोहिणी खडसे यांनी विदर्भ ,पश्चिम महाराष्ट्र, कोकण दौरा करून महिलांचे संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला.लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात दौरे करून त्यांनी सभा, कॉर्नर सभा, घेऊन गाठीभेटी ,प्रचार रॅली द्वारे उमेदवारांचा प्रचार केला.