चाळीसगावात भरदिवसा ज्वेलर्स मालकाला साडेसहा लाखाचा गंडा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज | तुषार देशमुख | शहरांमध्ये पोलिसांचे पथसंचलन सुरू असताना सदर बाजारांमध्ये एका सराफ व्यावसायिकाला दोन अज्ञात भामट्यांनी तब्बल साडे सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गंडवून चोरटे पसार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे शहरामध्ये पोलिसांचे पथसंचलन सुरू असताना हा प्रकार घडला त्यामुळे शहरामध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की शहरातील अफुगल्ली येथे  अरुण बाविस्कर यांचे उदय ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दुकान आहे या दुकानांमध्ये अरुण बाविस्कर हे 9 सप्टेंबर रोजी दुपारी दुकानामध्ये बसलेले असताना दोन इसम दुकानांमध्ये आले आणि त्यांना म्हणाले की आम्ही जैन धर्माचे प्रचारक आहोत. आमचे साधुमहाराज आलेले आहेत. त्यांना आम्हाला सोन्याची वस्तू भेट म्हणून द्यायची आहे. तरी तुमच्याकडे किती प्रकारच्या भेटवस्तू उपलब्ध आहेत हे आम्हाला दाखवा. असे त्या दोघांनी बाविस्कर यांना सांगितले. म्हणून बाविस्कर यांनी त्या दोघांना दुकानातील छोट्या-मोठ्या सोन्याच्या वस्तू दाखविल्या. तेव्हा ते दोघे तरुण म्हणाले की साधूमहाराज येतील व ते ज्या वस्तूला हात लावतील ती वस्तू त्यांना भेट म्हणून दिली जाणार आहे. आपण या सर्व वस्तू पिशवीत भरा व हे 4 हजार रुपये ऍडव्हान्स म्हणून घ्या. मी महाराजांना घेऊन येतो ते आल्यावर पिशवीत हा टाकतील त्यांच्या हाताला जी वस्तू लागेल ती भेट म्हणून त्यांना दिली जाईल.असे सांगून दोघांपैकी एक जण साधू महाराजांना घेण्यासाठी गेला. व एकजण दुकानात बसला दुकानात बसलेल्याने अरुण बाविस्कर यांना पिण्यासाठी पाणी मागितले बाविस्कर पाणी घेण्यासाठी घरात गेल्यानंतर जवळपास साडेसहा लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या पिशवीसह तो तरूण तेथून फरार झाला.आपली फसवणूक झाली आपण लूटलो गेलो याची कल्पना अरुण बाविस्कर यांना आल्यानंतर त्यांनी तातडीने नंदकिशोर बाविस्कर व आसपासच्या लोकांना बोलावले आणि घडलेली घटना सांगितली त्यानंतर नंदू बाविस्कर लगेच शहर पोलीस स्टेशनला आले. त्यांनी पोलीस निरीक्षक के.के पाटील यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर लगेच पोलिस निरीक्षक के.के पाटील व त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले सर्वांनी त्या दोघा भामट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अज्ञात चोरटे मिळून आले नाही. डी वाय एस पी कैलास गावडे यांनी सुध्दा घटनास्थळी तातडीने भेट दिली.आणि तपासाच्या दृष्टीने पोलिस अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.

 

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला सदरच्या फसवणूक प्रकरणी आयपीसी 420,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -