fbpx

सामान्यांना महागाईचा आणखी एक झटका ; घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२१ । आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कळस गाठत असताना सामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी आज जाहीर केलेल्या दरानुसार विनाअनुदानित १४.२ किलोच्या सिलेंडरच्या दरात १५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जळगावात विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत ९०४.५० रुपये इतकी झाली आहे.

mi advt

तर मुंबईत विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत 844.50 रुपयांवरुन 899.50 रुपये इतकी झाली आहे. तर दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरचा दर 884.50 रुपयांवरुन 899.50 रुपये इतका झाला आहे.

याच ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी 1 ऑक्टोबरला सरकाने 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरचा दर तबब्ल 43 रुपयांनी वाढवला होता. त्यानंतर आता 1 ऑक्टोबरपासून दिल्लीत 19 किलो कमर्शियल LPG Cylinder चा भाव 1693 रुपयांनी वाढून 1736.50 रुपये इतका झाला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांची दुकाने, स्टॉल्स, हॉटेल्स, रेस्टारंट किंवा ढाबे अशा सगळ्यांनाच झळ बसणार आहे. या सगळ्यांकडून खाद्यपदार्थांच्या किंमती वाढवल्या गेल्यास त्याचा अंतिम फटका सामान्य नागरिकांनाच बसणार आहे.

याआधी सप्टेंबर महिन्यात घरगुती LPG Gas Cylinder च्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोलियम कंपन्यानी 18 ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या. मे आणि जूनमध्ये सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. एप्रिलमध्ये सिलेंडरच्या दरात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज