महिलेस मारहाण करून लूटणाऱ्या रिक्षाचालकास अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । स्वस्तात टाईल्स मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेस मारहाण करून लुटल्याची घटना भुसावळ शहरातील खडका चौफुलीवर दि.२३ रोजी घडली होती. याप्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे.

भुसावळ येथील रहिवाशी रीषा मुनालाल गोयल यांना २३ रोजी रात्री नऊ वाजता संशयीत आरोपी शेख चाँद शेख हमीद याने स्वस्तात टाईल्स मिळवून देण्याचे आमिष दाखवून रिक्षामध्ये नेत मारहाण केली होती तसेच त्यांच्या हातातील सोन्याच्या तीन अंगठ्या व तीन हजार २०० रुपये रोख असा ऐवज चोरून नेला होता. दरम्यान, याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये, पोलीस नाईक निलेश चौधरी, विकास सातदिवे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत सोनार, बंटी कापडणे, आर.सी.पी.कर्मचारी अक्षय सूर्यवंशी आदींच्या पथकाने तपासचक्र फिरवीत संशयित शेख चाँद शेख हमीद यास अटक केली. पुढील तपास उपनिरीक्षक महाजन करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज