नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल जाहीर, 54 विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची रुची निर्माण व्हावी तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च तंत्रज्ञान व संशोधन संस्था बघता याव्यात यासाठी, मागील वर्षी नोबेल फाउंडेशन द्वारा राज्यस्तरीय नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा संपन्न झालेली होती. या परीक्षेच्या मुलाखतीचा अंतिम निकाल काल संध्याकाळी जाहीर करण्यात आला. याअंतर्गत राज्यभरातील शहरी तसेच ग्रामीण भागातील 54 विद्यार्थ्यांची इस्रो, आयआयटी सहलीसाठी निवड करण्यात आली आहे. नोबेल फाउंडेशन च्या माध्यमातून विज्ञान क्षेत्रात गेल्या सहा वर्षांपासून भरीव कार्य सुरू आहे.

राज्यभरातून चार हजार दोनशे तीस विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 620 विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड झालेली होती. त्यातून 54 विद्यार्थ्यांची अंतिम यादीत निवड झालेली आहे. यात पाचवी ते सातवी गटात कराड येथील ओम आनंद कुत्ते प्रथम तर इयत्ता आठवी ते दहावीच्या गटात पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलचा वैभव रामदास पाटील, दहावीत मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल अमळनेरचा विद्यार्थी मैत्रन्य महेश पाटील, अकरावी बारावी गटात अनुराग व्यंकटेश मांडके राज्यात प्रथम आलेला आहे. तसेच जळगाव येथील अश्विन भाऊसाहेब पाटील, कलकत्ता येथील प्रेम अनिष शाह, मुंबई येथील तन्मय पंकज चौधरी गुणवत्ता यादीत द्वितीय आलेले आहेत.

या विद्यार्थ्यांना नोबेल फाऊंडेशन’तर्फे इस्रो अहमदाबाद, आयआयटी गांधिनगर आणि आयआयएम अहमदाबाद या सर्वोच्च शिक्षण व तंत्रज्ञान संस्थांना अभ्यास सहलीसाठी नेण्यात येणार आहे. परीक्षेच्या यशस्वीतेसाठी ओमकार करिअर अकॅडमी चे संचालक संतोष पवार, परीक्षा समन्वयक अमोल पवार, राजेंद्र पाटील, योगेश पाटील, विक्रांत पाटील, हर्षल ठाकूर, प्राजक्ता राजपूत, सुधीर महाले यांनी परिश्रम घेतले.

यावर्षी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा जून महिन्यात होणार असून अर्ज भरण्याची सुरुवात 12 जानेवारी पासून www.nobelfoundation.co.in या संकेतस्थळावर होणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओमकार करिअर अकॅडमी, सायन्स इंनोवेशन अंड अॅक्टिविटी सेंटर शारदानगर बारामती स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल यांचे सहकार्य लाभले.

याबाबत प्रतिक्रिया देताना नोबेलचे संस्थापक जयदीप पाटील म्हणाले की, “54 विदयार्थी इस्रो साठी निवड होणे ही एक वैज्ञानिक क्रांती आहे. खेड्या पाड्यातील मुलांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान बाबत गोडी निर्माण होत आहे. नोबेल च्या कार्याला आता फळ मिळायला लागले आहे. या परीक्षेमुळे सर्वत्र विज्ञानमय वातावरण निर्माण होत आहे. डॉ.एपीजे कलमांची स्वप्नं पूर्ण करणारी युवा पिढी यातून निर्माण होईल.”

इस्रो सहलीसाठी पात्र विद्यार्थी यादी

गट अ (5 वी ते 7 वी)

 1. तेजस निलेश उत्तरवार – इयत्ता 5 वी – चंद्रपुर
 2. समकीत पी. नाहर – इयत्ता 5 वी – पुणे
 3. आर्या अधिक चव्हाण – इयत्ता 5 वी – घाटकोपर (प) जि. मुंबई
 4. आरुषी कपिल धर्माळे – इयत्ता 5 वी – अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती
 5. धैर्यशील धनंजय दाभाडे – इयत्ता 5 वी – बारामती, जि. पुणे
 6. साई राजेश पाटील – इयत्ता 6 वी – शिरोळ, जि. कोल्हापुर
 7. अनुष्का गणेश वामन – इयत्ता 6 वी – सिन्नर, जि. नाशिक
 8. राजवीर रोहित शेठ – इयत्ता 6 वी – पुणे
 9. रुद्रा चंद्रशेखर हेल्गावकर – इयत्ता 6 वी – खेड जि. रत्नागिरी
 10. शौर्या संदेश सावंत – इयत्ता 6 वी – चिंचवड जि. पुणे
 11. सृष्टी उत्तम नले – इयत्ता 6 वी – संगरूळ ता. करवीर जि. कोल्हापूर
 12. रणवीर रोहन शेठ – इयत्ता 6 वी – बीड
 13. सुमेध सागर देशपांडे – इयत्ता 6 वी – नवी मुंबई
 14. तनिश्क़ नरेंद्र सरोदे – इयत्ता 6 वी – जळगाव
 15. ओम आनंद कुत्ते – इयत्ता 7 वी – मलकापुर, ता. कराड, जि. सातारा
 16. आश्विन भाऊसाहेब पाटील इयत्ता 7 वी – चाळीसगांव, जळगांव.
 17. सोहम संजय चौधरी – इयत्ता 7 वी – औरंगाबाद
 18. आर्या जीवन जोशी – इयत्ता 7 वी – शिवने, जि. पुणे
 19. दर्शिल भारत सोनवणे – इयत्ता 7 वी – आक्रुडी, जि. पुणे
 20. प्रसन्न हिम्मत चौधरी – इयत्ता 7 वी – अमळनेर जि. जळगाव
 21. श्रावणी क्रिष्णा कुदळे – इयत्ता 7 वी – बारामती जि. पुणे
 22. सोहम सचिन यादव – इयत्ता 7 वी – कल्याण जि. ठाणे
 23. कपिल कैलास सावंत – इयत्ता 7 वी – सोलापूर
 24. यश मारोतराव कल्याणकर – इयत्ता 7 वी – पिंपळगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड
 25. लाभेश हेमंत बाहेती – इयत्ता 7 वी – जळगाव
 26. शार्दुल मिलिंद येडगे – इयत्ता 7 वी – मलकापूर ता. कराड, जि. सातारा
 27. काव्या देवांग शाह – इयत्ता 7 वी – सांगली
 28. अथर्व विकास मुके – इयत्ता 7 वी – नांदुरा जि. बुलढाणा
 29. गांधार नितीन दरेकर – इयत्ता 7 वी – बदलापूर (ई) जि. ठाणे
 30. अनुषा मनोज उमरटकर – इयत्ता 7 वी – यवतमाळ
 31. सोहम चंद्रकांत लोया – इयत्ता 7 वी – इचलकरंजी, जि. कोल्हापूर
 32. सिद्धी केशव खटावकर – इयत्ता 7 वी – मलकापूर जि. सातारा

गट ब (8 वी ते 10 वी)

 1. वैभव रामदास पाटील – इयत्ता 8 वी – भडगांव, ता. पाचोरा, जि. जळगांव
 2. रिया रोहन शेठ – इयत्ता 8 वी – धनकवाडी, जि. पुणे
 3. प्रणव राजेंद्र पाटील – इयत्ता 8 वी – चाळीसगाव जि. जळगाव
 4. प्रेम आशिष शहा – इयत्ता 9 वी – कोलकाता, प. बंगाल
 5. सिध्दांत चेतन पाटील – इयत्ता 9 वी – हडपसर, जि. पुणे
 6. सक्षम शिल्पक तांबे – इयत्ता 9 वी – वडाला, जि. मुंबई
 7. अथर्व विजय चावडीमनी – इयत्ता 9 वी – कराड, जि. सातारा
 8. वरद विजय राव – इयत्ता 9 वी – जळगाव
 9. आदित्य अमित सालागरे – इयत्ता 9 वी – महाड, जि. रायगड
 10. मैत्रन्य महेश पाटील – इयत्ता 10 वी – अमळनेर, जळगांव
 11. वेदांत प्रवीण बोरसे – इयत्ता 10 वी – जळगांव
 12. तनय मकरंद सोनवणे – इयत्ता 10 वी – ठाणे (पश्चिम)
 13. दिपक राजेंद्र पाटील – इयत्ता 10 वी – अमळनेर, जि. जळगाव
 14. श्रीया अमोल तडे – इयत्ता 10 वी – हडपसर, जि. पुणे
 15. संस्कार रमेश चौधरी – इयत्ता 10 वी – कटराज, जि. पुणे
 16. ओमकार विलास वालुंज – इयत्ता 10 वी – कल्याण (पश्चिम) जि. ठाणे
 17. अनुराग दिलीप ठाकरे – इयत्ता 10 वी – पारोळा, जि. जळगाव
 18. रितिका सुधीर गोहाणे – इयत्ता 10 वी – नवेगाव, जि. गडचिरोली

गट क ( 11 वी 12 वी डिप्लोमा)

 1. अनुराग व्यंकटेश मांडके – इयत्ता 11 वी – एरंडावने, जि. पुणे
 2. तन्मय पंकजकुमार चौधरी – इयत्ता 11 वी – बांद्रा (पुर्व) मुंबई
 3. प्रतिक दादापातील दिघे – इयत्ता 12 वी – संगमनेर, जि. अहमदनगर
 4. कौस्तुभ दिनेश भावसार – इयत्ता 12 वी – धरणगाव, जि. जळगाव

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -