रेस्ट हाऊस अत्याचार कांडची दिवसभर गावात चर्चा!

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२१ । शहरातील एका विश्रामगृहात एका तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेची दुपारपासून चर्चा आहे. पोलीस यंत्रणा देखील या प्रकरणाच्या तपासात लागली असून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे समजते.

जळगाव शहर नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. सेक्स कँडल असो की घोटाळे असो जळगाव शहर अव्वल असते. जळगावातील एका रेस्ट हाऊसमध्ये शनिवारी एका तरुणीवर ४ जणांनी अत्याचार केल्याची चर्चा रविवारी दिवसभर रंगत होती. जळगाव लाईव्हला देखील याबाबत विचारणा झाली.

अत्याचार प्रकरणाचा शोध घेतला असता जळगाव लाईव्ह टीमला काही माहिती मिळाली. पीडित तरुणी एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याशी संबंधित असून तिने सकाळी एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण जळगाव शहरातील स्थानिक पोलिसात देखील पोहचले असून संशयीत आरोपी दिग्गज असल्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे समजते.

दिवाळीच्या सणासुदीच्या जिल्ह्याचे दोन दिग्गज नेते जळगावात असल्याने राजकीय चर्चांना देखील उधाण आले आहे. एका राजकीय पक्षाचा मोठा पदाधिकारी या प्रकरणात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, सदर घटनेबाबत कोणतीही अधिकृत तक्रार पोलिसात दाखल नाही. तसेच कोणताही ठोस माहिती नसल्याचे त्यांनी जळगाव लाईव्हला सांगितले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज