fbpx

पारोळा शहरात विकेंड लॉकडाउनला उस्फूर्त प्रतिसाद

mi-advt

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर शासनाने संपूर्ण राज्यात शनिवार आणी रविवार या दोन दिवसांसाठी विकेंड लॉकडाउन लागू जाहीर केला असून या लॉकडाउन पारोळ्यात प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. व्यापारी बांधवांनी प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. 

शहरात सकाळी नऊला बाजारपेठेसह पालिका चौक, गावहोळी चौक, बालाजी मंदिर, तलाव गल्ली, कजगाव नाका यासह व्हरायटी कॉर्नर ते एनईएस हायस्कूल या परिसरात शुकशुकाट दिसून आला. दहानंतर पालिका चौकातील काही किराणा दुकाने, भाजीपाला, बेकरी आदी दुकानांना सुरवात झाली. मात्र, नागरिकच बाजारपेठ परिसरात फिरकत नसल्याने दुपारीच किराणा दुकाने व्यापाऱ्यांनी बंद केली.

पालिकेत व्यापारी व नागरिकांनी कोरोना चाचणी करावी, यासाठी पालिकेत ॲन्टिजेन चाचणी घेण्यात आली. मात्र, विकेंड लॉकडाउनमुळे चाचण्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. 

बाजारपेठ परिसरासह महामार्गावर शीतपेय, रेस्टॉरंट, चहा दुकाने व इतर सर्व प्रकारची दुकाने बंद दिसून आली. ग्रामीण भागातील नागरिक शहरात दिसून आल्याने सर्वत्र परिसरात निर्मनुष्य परिस्थिती दिसून आली. तुरळक अत्यावश्यक दुकाने वगळता सर्व व्यापारी बांधवांनी या विकेंड लॉकडाउनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. परिणामी, बसस्थानकात देखील प्रवाशांअभावी सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज