देवकर हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला प्रचंड प्रतिसाद

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । शिरसोली रस्त्यावरील गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष्य रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शस्त्रक्रियेपूर्वी आवश्यक असलेल्या मोफत तपासणीसाठी रुग्णांची गर्दी होत असून, दर गुरुवारी या रुग्णांवर अवघ्या पंचवीसशे रुपयांत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

देवकर रुग्णालयातर्फे “ना नफा ना तोटा” या तत्त्वावर मोतिबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत दर गुरुवारी केवळ दोन हजार पाचशे रुपयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यात रुग्णांच्या सर्व तपासण्या, अत्याधुनिक लेंस, रुग्णाच्या निवास व भोजनाचीही सोय केली जात आहे. त्यामुळे रुग्णांचा मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दर गुरुवारी शस्त्रक्रिया होणार असली, तरी फिटनेस सर्टिफिकेटसाठी कोणत्याही दिवशी रुग्णालयात येऊन मोफत पूर्व तपासणी करून घेणे आवश्यक आहे. नेत्रविकार असलेल्या रुग्णांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी डॉ.नितीन पाटील मो क्र. 9422977071 व 7507724200 यांच्याशी संपर्क साधावा.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -