खडसे-देवकरांकडून डॉ.अश्विनी देशमुख यांचा सन्मान

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । शहराच्या माजी नगरसेविका डॉ.अश्विनी विनोद देशमुख यांना नेल्सन मंडेला ॲकॅडमी अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून नुकतेच डॉक्टरेट व नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेल्याने डॉ.देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

शहरातील माजी नगरसेविका डॉ.अश्विनी देशमुख यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना नुकतेच नेल्सन मंडेला ग्लोबल पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारून जळगावात परतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे तसेच माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी डॉ.अश्विनी देशमुख यांना मिळालेल्या सम्माना बद्दल त्यांचे कौतुक करीत सत्कार केला.

यावेळी माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी, अशोक पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, महिला शहरअध्यक्षा मंगला पाटील, अशोक लाडवंजारी, सुनिल माळी, मिनाक्षी चौव्हाण, विशाल देशमुख, मनोज वाणी, मुविकोराज कोल्हे, यशवंत पाटील, जावेद शेख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेल कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने मनोज वाणी यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -