fbpx

आमदारांनी सूचना दिल्यावर सुप्रीम कॉलनीतील रहिवाशांना १२ दिवसानंतर मिळाले पाणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ मे २०२१ । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीमधील गजानन महाराज मंदिरामागील गल्ली व परिसरात केल्या 12 दिवसापासून पाणी पुरवठा झाला नव्हता. त्यामुळे परिसरातील जनतेचे खूप हाल झाले. काही लोकांनी पाणी पिण्यासाठी 30 – 30 रुपयाची कॅन घेऊ तहान भागवली तर काहींनी शेजारील कंपनीत जाऊन  कंपनी मालकाशी विनवणी करून पाणी मिळविले. तर काहींनी यथा शक्ती प्रमाणे 4-5 लोक मिळून पाण्याचे टँकर मागविले अश्या भीषण परिस्थितीचा विचार करून भाजपा युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर सोशल मीडिया प्रमुख भूषण मनोहर जाधव यांनी गेल्या 12 दिवसात 4-5 वेळा जळगाव मनपा पाणी पुरवठा अभियंता भांडारकर साहेब यांच्याशी पाणी समस्या बाबत बोलणी केली. त्यानंतर त्यांनी 4-5 वेळा बोलणे टाळले.

सरते शेवटी भुषण मनोहर जाधव यांनी जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे व जळगाव मनपाचे स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील तसेच अमित साळुंखे यांच्याशी बोलने केले. त्यानंतर राजुमामा भोळे व राजेंद्र घुगे पाटील यांनी सांगितले की तुमच्या कडे 1 दिवसातच पाणी येईल त्यानंतर आमदार राजुमामा भोळे व जळगाव मनपाचे स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्याची कान उघडणी केल्यानंतर  3 मे 2021 सोमवार रोजी संध्याकाळी 5.30 वाजता पाणी पुरवठा झाला. पाणी पुरवठा झाल्याबद्दल परिसरातील रहिवाशांनी व भाजपा युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर सोशल मिडिया प्रमुख भूषण मनोहर जाधव यांनी आमदार राजुमामा भोळे व जळगाव मनपाचे स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील तसेच अमित साळुंखे यांचे आभार मानले.

mi advt

मात्र जीवनावश्यक मूलभूत सुविधा कडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असेल तर अश्या संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाही करावी अशी मागणी परिसरातील रहिवाशी व भाजपा युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर सोशल मिडिया प्रमुख भुषण मनोहर जाधव यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज