⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अमळनेरचे रहिवासी प्रा. शशिकांत पाटील यांची पुरस्कार समितीवर निवड

अमळनेरचे रहिवासी प्रा. शशिकांत पाटील यांची पुरस्कार समितीवर निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । विनोद कदम । अमळनेर तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील रहिवासी व कोकणातील खालापूरस्थित विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक शास्त्र व अभियांत्रिकी विभागाचे ज्येष्ठ प्रा. व विभागप्रमुख प्रा. शशिकांत पाटील यांची आय ट्रिपल ई संस्थेच्या अंतर्गत ऍन्टेना सोसायटीच्या फिल्ड पुरस्काराच्या तदर्थ नामांकन समितीवर तज्ज्ञ सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

आय ट्रिपल ई या जागतिक दर्जाच्या व प्रथित यश संस्थेच्या ३९ सोसायटी असून दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य व नामांकित ऍंटेना व प्रोपेगेशन सोसायटीची स्थापना १९४९ साली झाली. हि संस्था सुमारे ४० देशांत दळवळण माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत हजारो प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक, तज्ज्ञ मार्गदर्शक, अभियंते सदस्य असून अविरतपणे संशोधन क्षेत्रात भरीव योगदान करीत आहेत. संस्थेतर्फे अँटेना व दूरसंचार क्षेत्रात जागतिक कीर्तीचे योगदान देणाऱ्याना  दरवर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पुरस्कारासाठी जगभरातून नामांकन आमंत्रित केले जातात किंवा या क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच ज्येष्ठ सदस्यांतर्फे नामनिर्देशित केले जातात. त्यासाठी तात्कालिक किंवा तदर्थ नामांकन समिती गठीत करण्यात येते आणि  तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्या साहाय्याने पुरस्कार समिती संयोजनाचे काम करीत असते.

यावर्षीच्या समितीत कॅनडा येथील प्रा. अब्देल सेबाक यांची चेअर म्हणून निवड करण्यात आली. यांच्यासह ५ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत अमेरिकेचे २, इटली व इंग्लंड येथील प्रत्येकी १ व प्रा.शशिकांत पाटील हे आशिया विभागातून एकमेव सदस्य आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. प्रा. शशिकांत पाटील हे अमळनेर येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक एस. बी. पाटील यांचे चिरंजीव असून दिव्यमराठीचे ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील यांचे लहान बंधू आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र स्वागत होत आहे.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह