बोदवड नगरपंचायतीच्या‎ ४ जागांचे आरक्षण जाहीर‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ ।‎ बाेदवड नगरपंचायतीच्या चार‎ प्रभागांची निवडणूक ओबीसी‎ आरक्षणाच्या निर्णयामुळे स्थगित‎ करण्यात आली होती. अखेर गुरुवारी‎ उपविभागीय अधिकारी तथा‎ निवडणूक निर्णय अधिकारी‎ रामसिंग सुलाने यांनी या चार‎ प्रभागांचे निश्चित केलेले आरक्षण‎ जाहीर करून निवडणूक‎ कार्यक्रमाचीही माहिती दिली.‎ त्यानुसार प्रभाग क्रमांक दाेन मध्ये‎ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक तीन‎ मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग‎ क्रमांक १५ मध्ये सर्वसाधारण व‎ प्रभाग क्रमांक १७ मध्ये सर्वसाधारण‎ महिला या प्रमाणे आरक्षण जाहीर‎ करण्यात आले आहेत.

२९ डिसेंबर‎ ‎ ते ३ जानेवारी २२ पर्यंत सकाळी ११ ते‎ ३ या वेळेत नामनिर्देशनपत्र सादर‎ करावयाचे आहेत. १ व २‎ जानेवारीला दोन दिवस सुट्टी‎ असल्याने नामनिर्देशनपत्र‎ स्विकारले जाणार नाहीत. तसेच‎ नामनिर्देशन पत्रांची छाननी व‎ वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या‎ उमेदवारांची यादी ४ जानेवारीला‎ प्रसिद्ध करण्यात येईल. माघारीसाठी‎ अंतिम मुदत १० जानेवारी दुपारी ३‎ वाजेपर्यंत आहे. निवडणुकीसाठी‎ मतदान प्रक्रिया १८ जानेवारीला‎ हाेईल. तर मतमाेजणी १९‎ जानेवारीला करून निकाल जाहीर‎ केला जाणार असल्याची माहिती‎ सहाय्यक निवडणूक निर्णय‎ अधिकारी आकाश डोईफोडे यांनी‎ दिली.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -