जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्यमार्गावर गायीला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या घटनेत गायीच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. हा प्रकार यावल छत्रपती ग्रुपच्या सदस्यांना निर्दशनास आला. त्यांनी प्राणीमित्र डॉ.विवेक अडकमोल यांना माहिती दिली. त्यानंतर गायीवर मोफत उपचार करण्यात आले.
शहरात विविध भागात मोकाट गुरे फिरत असतात. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्यमार्गावर मोकाट गुरे बसलेली असतात. भुसावळ टी-पॉइंटजवळ एका गायीला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. त्यामुळे गायीच्या पायाला दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला होता. छत्रपती ग्रुपच्या सदस्यांनी शहरातील प्राणीमित्र डॉ. विवेक अडकमोल यांना घटनेची माहिती कळवली. त्यांनी क्षणाचाही विंलब न करता घटनास्थळ गाठून जखमी गायीवर उपचार केले.
वेळीच उपचार मिळाल्याने जखमी गायीचे प्राण वाचले. यासाठी छत्रपती ग्रुपचे सदस्य अरुण सावकारे, नरेंद्र शिंदे, अमोल सोनावणे, उमेश धनगर, शाहरुख तडवी यांनी पुढाकार घेतला. परिसरात जखमी प्राण्यावर उपचाराची गरज भासल्यास, संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. विवेक अडकमोल यांनी केले आहे.