fbpx

शहरातील रस्ते दुरुस्त करा अन्यथा खळखट्याक करू – मनसे

mi-advt

जळगाव लाईव्ह न्युज | २५ ऑगस्ट २०२१ | जळगाव शहराचा रस्त्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खळखट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा जमील देशपांडे यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना दिला आहे.

जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत असलेल्या प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. अमृत योजनेच्या नावाखाली शहरातील चांगले रस्ते खोदून ठेवले आहेत. काम झाल्यावर कर्मचारी तीच माती टाकतात आणि गायब होतात. यामुळे नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. यातच उद्या कोणाचा अमृत मुळे जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण? असा प्रश्नही यावेळी मनसेतर्फे विचारण्यात आला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज