युवकाच्या हातातून मोबाईल लांबवला; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । बसस्थानक लगतच्या भजे गल्लीतील सुयोग हॉटेलसमोरून बुधवारी रात्री ८.४० वाजेच्या सुमारास एका तरुणाच्या हातातून दोन अज्ञात व्यक्तींनी मोबाइल व ४ हजार ५०० रुपये रोख रक्कम जबरीने हिसकावून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

खेडी येथील युवक विक्की बाबासाहेब गायकवाड ( वय माहित नाही ) हा घराकडे जात होता. यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्या हातातून ३० हजार रुपये किमतीचा मोबाइल व ४ हजार ५०० रुपये रोख रक्कम जबरीने हिसकावून नेले. त्यानंतर दोघांनी तेथून पळ काढला.असून,  गायकवाडच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज