fbpx

शेतकऱ्यांना दिलासा : ई-पिक नोंदणीला मुदतवाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । शेतातील उभ्या पिकांचा फोटो घेऊन पिकाची माहिती थेट तलाठी यांना पाठविण्याची सुविधा ई-पीक पाहणीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अद्यापही काही शेतकऱ्यांना माहिती भरता आलेली नाही, त्यामुळे शासनाकडून ई-पीक पाहणीच्या माध्यमातून ई-पीक नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी का होईना दिलासा मिळाला आहे.

शेतातील पिकांची माहीती अर्थात पीकपेरा स्वत: मोबाईलमधील अ‍ॅपच्या माध्यमातून नोंदवुन तलाठ्यापर्यत पोहचविण्याचा ई-पीक पाहणी कार्यक्रम १५ ऑगस्टपासुन राज्यभरात राबविण्यात येत आहे. आतापर्यत ७० लाख शेतकऱ्यांनी मोबाईलमधील अ‍ॅपच्या माध्यमातुन आपापल्या शेतातील पिकनोंदणी यशस्वीरीत्या नोंदवली आहे. दि.३० सप्टेंबरपर्यत खरीपातील पिकांची ई-पिक नोंदणी करण्याची मुदत देण्यात आली होती, मात्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच तांत्रिक अडचणीमुळे असंख्य शेतकरी पिकपेऱ्यांची नोंदणी अद्यापर्यत करु शकले नाही. दरम्यान, शेतकऱ्यांना उद्भभवलेल्या समस्या व अडीअडचणी लक्षात घेत प्रशासनाकडुन दि.१४ ऑक्टोबरपर्यत ई-पिक नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.

mi advt

लाभ घेण्याचे आवाहन
राज्यस्तरीय अंबलबजावणी समितीची बैठक दि.३० सप्टेंबर रोजी सपन्न झाली. बैठकीमध्ये राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी मोबाईलद्वारे नोंदणी करण्यास अडचणी निर्माण झाल्यामुळे सन २०२१-२२ चा खरिप हंगामातील पीक पहाणी मोबाईल अ‍ॅपद्वारे करण्यासाठी दि.१४ ऑक्टोबरपर्यत मुदतवाढ देण्यात आली. या सुविधेचा शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज