Big Breaking : राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंध हटवले, राजेश टोपेंची घोषणा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ ।  राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार का? या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंधाबाबत एक मोठी घोषणा केली आहे केली.

राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा टोपे यांनी केली. निर्बंध हटविलेल्या जिल्ह्यात जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिकचा समावेश आहे. आज टास्क फोर्सची मिटींग पार पडली.  त्यानंतर राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना ही घोषणा केली. यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर त्यावर येत्या १ ते २ दिवसांमध्ये जीआर निघेल असं देखील ते म्हणाले.

राज्यातील अकरा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती अजून निवळलेली नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील नगरमध्ये निर्बंध कायम राहतील. हे अकरा जिल्हे लेव्हल तीनमध्येच राहणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

या जिल्ह्यात होणार निर्बंध शिथिल

मराठवाडा: परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद

विदर्भ: अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा. यवतमाळ, वर्धा, वाशीम, हिंगोली

कोकण: रायगड, ठाणे, मुबई

 

उत्तर महाराष्ट्र: जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक

शनिवारी ४ वाजेपर्यंत खुली राहणार दुकाने

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, ज्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत, त्यात शनिवार-रविवार लॉकडाऊन, खासगी कार्यालयांच्या वेळा अशा विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार, शनिवार-रविवार पूर्णपणे बंदऐवजी शनिवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत दुकानं सुरू आणि फक्त रविवारी बंद, खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असल्यास अशा ठिकाणी ५० टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालये सुरू करण्याची मुभा अशा गोष्टींचा समावेश असेल. शॉप, रेस्टॉरंट, सिनेमाहॉल या गोष्टींना या अटी लावून त्या सुरू करण्यात येऊ शकेल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -