Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । तालुक्यातील कोरपावली येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी भरड धान्य धरेदीसाठी नाव नोंदणी सुरु झाली असून १५ ऑक्टोबर अंतिम तारीख आहे. शासकीय सुटीच्या दिवशी देखील नोंदणी सुरु असणार असून शेतकऱ्यांनी नाव नोंदणी साठी आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स, पिकाचा ऑनलाईन चालु २०२२-२३ खरीप हंगामाचा (ज्वारी / मका/ बाजरी ) या पिकाचा पेरा नोंदविलेला ७/१२ उतारा तलाठी यांची स्वाक्षरी असलेला घेऊन संस्थेशी त्वरीत संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
२०२२-२३ वर्षाच्या हंगामात केंद्र शासना कडुन किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत ( खरीप) हंगाम भरडधान्य( ज्वारी ,मका,बाजरी ) खरेदी केंद्र यावल ,उपअभिकर्ता संस्था म्हणून दि. ४ रोजीच्या जिल्हा पणन अधिकारी याचेकडुन पाप्त ईमेल संदेशानुसार तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मार्फत नोंदणी सुरू झालेली आहे.
शासकीय हमीभाव
ज्वारी -२ हजार ९७० रुपये, मका १ हजार ९६२ रुपये, बाजरी २हजार ३५० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे आहे .