⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | बहीणीचा विश्वासघात करून भावाकडून हक्कसोड लेख दस्त नोंदणी!

बहीणीचा विश्वासघात करून भावाकडून हक्कसोड लेख दस्त नोंदणी!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । बहीणीच्या असुक्षितपणाचा फायदा घेऊन वाटणीपत्र नोंदवित असल्याचे भासवत हक्कसोड करून बहीणीचा विश्वासघात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भाऊ-भावजयी विरोधात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

कमलबाई आनंदा महाजन ( रा.पातोंडा ता.अमळनेर ) या अशिक्षित असुन त्यांचे भाऊ व त्यांची एरंडोल येथे सामाईक मिळकत आहे. त्यांचा भाऊ प्रल्हाद याने आपल्या वडीलोपार्जित जमीनीची सर्वांना वाटणीची नोंदणी केल्यानंतर समान हक्क मिळेल. असे सांगीतल्याने भाऊ व वहीनी यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन वाटणीची कागदपत्रे तयार करून दुय्यम निबंधक कार्यालय एरंडोल येथे कागदपत्रांवर अंगठा ठेवण्यास सांगीतले. त्यानंतर त्यांच्याकडे नोंदणीची प्रत मागीतली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने आपसात समान हिस्से वाटणी न करता विनामूल्य हक्कसोड नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यांच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन भाऊ-भावजयीकडून त्यांचा विश्वासघात झाला.

अश्या आशयाची फिर्याद एरंडोल पोलिस स्टेशन ला कमलबाई यांनी दिल्यावरून गुन्हा दाखल झाला. पुढील तपास हेड काँन्स्टेबल अनिल पाटील, जुबेर खाटीक, संतोष चौधरी हे करीत आहेत.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह