पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 71 हजार असंघटित कामगारांची नोंदणी करणार ; खा.उन्मेष पाटील

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्रसरकारने गोरगरिबांसाठी राबविलेल्या अनेक योजना या तळागाळापर्यंत पोहोचावी या उद्देशाने 17 सप्टेंबर या पंतप्रधानांच्या वाढदिवशी सेवा व संवर्धन पंधरवडा अंतर्गत श्रमिक लेबर कार्ड नोंदणी अभियान राबवून 71 हजार संघटित कामगार नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशी माहिती जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव येथे त्यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

खासदार उन्मेष पाटील यांनी असे सांगितले की देशात जवळपास 36 कोटी असंघटित कामगार घटक असून अद्याप त्यांची नोंदणी झाली नसल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही. या योजनांचा लाभ तळागाळातील असंघटित कामगारांना मिळावा म्हणून जळगाव मतदारसंघातील जास्तीत जास्त श्रमिक कामगारांची नोंदणी अभियान सुरू केले आहे.

या अभियानात असंघटित कामगार व जे कामगार शासकीय व निमशासकीय तसेच आयकर भरणारे आहेत अशांना सोडून उरलेल्या कामगारांची नोंदणी करण्यात येणार आहे. अभियानात सुमारे 152 कामगारांना आपले आयुष्य सुरक्षित करता येणार असून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे.

345 बूथवरून ही नोंदणी होणार आहे. बारा बलुतेदार मधील लहान व सीमांत शेतकरी, शेतमजूर ,सुतार, कुंभार न्हावी, पशुपालक, आशा कामगार, अंगणवाडी सेविका, रस्त्यावरचे विक्रेते, बांधकाम कामगार, दूध उत्पादक शेतकरी,भाजी व फळ विक्रेता, ऑटोचालक, गवंडी, लोहार, सुरक्षा कर्मी, इलेक्ट्रिशियन, मच्छिमार, बिडी कामगार,वीटभट्टी, खोत काम करणारे कामगार, रेशीम कपडे विणणारे कामगार, घर काम करणाऱ्या महिला पुरुष, अशा अनेक कामगारांना श्रमिक कार्डचा लाभ मिळणार आहे.

यासाठी आधार, कार्ड सक्रिय बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर आधार कार्डची जोडलेला हे लागणार आहेत. ही नोंदणी तालुक्यातील व शहरातील 345 ठिकाणी केली जाणार असून त्यासाठी 3500 कार्यकर्ते यात सहभाग नोंदविणार आहेत.अशी माहिती खासदारांनी दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -