fbpx

तेलाचे दर दणकून आपटले; केंद्राने कस्टम ड्यूटी केली कमी, जाणून घ्या आजचे दर..

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । आजकाल वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाच्या समस्या खूप वाढल्या आहेत. हे पाहता केंद्र सरकारने सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने पाम आणि सूर्यफूल तेलावरील कृषी उपकर आणि कस्टम ड्यूटी कमी केली आहे. यापूर्वी, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने तेल आणि तेलबियांवर स्टॉक मर्यादा लादण्याचा आदेश जारी केला होता. साठा मर्यादा ३१ मार्च २०२२ पर्यंत लागू राहील. राज्यांना आदेश जारी करण्यास आणि त्याचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. शासनाच्या आदेशामुळे गेल्या आठवड्यात गगनाला भिडलेले तेलाचे दर आज एकदम खाली आले आहेत.

आयात शुल्कात कपात झाल्याचा परिणाम
सरकारच्या या निर्णयानुसार, कच्च्या पाम तेलावरील शुल्क 8.25% (आधी 24.75%), आरबीडी पामोलिन 19.25 (आधी 35.75), आरबीडी पाम तेलावर 19.25 (आधी 35.75), कच्च्या सोया तेलावरील शुल्क कमी करण्यात आले आहे. 5.5 (आधी 24.75), सोया तेलावर 19.5 (आधी 35.75), कच्च्या सूर्यफूल तेलावर 5.5 (आधी 24.75) आणि परिष्कृत सूर्यफूल तेलावर 19.25 (आधी 35.75). शुल्क कमी केल्यामुळे, सीपीओच्या किमतीत 14,114.27 रुपये, आरबीडी 14526.45 रुपयांनी, सोया तेल 19351.95 रुपये प्रति टन कमी झाले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर खाद्यतेलात प्रतिकिलो ८ ते १५ रुपयांची कपात होणार आहे.

mi advt

निर्णय केव्हा अंमलात येईल
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) अधिसूचनेत म्हटले आहे की, 14 ऑक्टोबरपासून शुल्कात कपात लागू होईल आणि 31 मार्च 2022 पर्यंत लागू राहील. शासनाने कपात केलेले कृषी उपकर आणि कस्टम ड्युटीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

गेल्या महिन्यात आयात शुल्कही कमी केले
गेल्या महिन्यात 11 सप्टेंबर रोजी पाम तेल, सोया तेल आणि सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क कमी करण्यात आले होते. तर कच्च्या पाम तेलावरील मूलभूत आयात शुल्क 10 टक्क्यांवरून 2.5 टक्के करण्यात आले. त्याचबरोबर कच्च्या सोया तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कही 7.5 टक्क्यांवरून 2.5 टक्के करण्यात आले.

जळगावात असे असणार दर
कस्टम ड्यूटी कमी झाल्यानंतर जळगावात सोयाबीन तेलाचे भाव 125 ते 130 रुपये प्रति किलोवर येतील. तर पाम तेलाची किंमत 110 ते 115 रुपये प्रति किलोवर येतील.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज