डाक विभागात भरती; वाचा कोण करू शकतो अर्ज

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । केंद्र सरकारच्या भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूंकरीता विविध पदांच्या भरतीचा कार्यक्रम प्रसिध्द करण्यात आला आहे. खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी जाहिरातीमधील अनुच्छेद १२ मधील ६४ खेळ प्रकार पात्र आहेत. या खेळ प्रकारातील फक्त भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडू पात्र ठरणार आहेत. संबंधित खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून प्रमाणित करुन देण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील भारतीय डाक विभागाच्या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या पात्र खेळाडूंचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे स्वीकारुन प्रमाणित करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय येथे २२ नोव्हेंबरपूर्वी पाठविण्यात येणार आहे. पात्र खेळाडूंची कामगिरी प्रमाणित करणारे विहित नमुन्यातील फॉर्म खेळाडूंनी बिनचूक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत.

प्रमाणपत्र प्रमाणित करण्याकरीता पुणे कार्यालयात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत सादर करण्यात येईल. त्यानंतर क्रीडा व युवक सेवा संचालनालय येथून पात्र खेळाडूंची कामगिरी प्रमाणित करणारे विहीत नमुन्यातील फॉर्म-४ प्राप्त झाल्यावर या कार्यालयामार्फत खेळाडूंना देण्यात येतील. खेळाडूंनी दिलेल्या नमुन्यात जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या नावाने विनंती अर्ज व प्रमाणपत्राची सत्यप्रतीसह अचूक अर्ज १८ नोव्हेंबर पूर्वी सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज