fbpx

मनपाच्या अतिक्रमण विभागाची बंपर वसुली, लॉकडाऊन काळात ७० लाखांचा दंड वसूल

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२१। चिन्मय जगताप। जिल्ह्यासह राज्यात कोरोनावर अंकुश ठेवण्यासाठी राज्य शासनातर्फे कडक लॉकडाऊनचे आदेश दिले होते. अशा वेळेस देखील जे व्यवसायिक व्यवसाय करत होते अश्या व्यवसायिकांवर अंकुश ठेवत महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गेल्या दोन वर्षात तब्बल ७० लाख ६१ हजार ६५४ रुपयांची दंडात्मक वसुली केली आहे.

कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी व शासनाने दिलेले नियम पाळले गेले पाहिजे यासाठी महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने केल्या दोन वर्षात मोठी कामगिरी बजावली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या विभागाला 50 कर्मचाऱ्यांची गरज आहे अशा विभागातील केवळ १५ जणांनी ही इतकी मोठी कामगिरी बजावली आहे. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत ३६ लाख २२ हजार ५८५ रुपयांची वसुली मनपाच्या अतिक्रमण विभागाने केली तर एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ या केवळ ४ महिन्याच्या कालावधीत याचं विभागाने ३६ लाखं २३ हजार ७४५ रुपये इतकी दंडात्मक कारवाई केली आहे.

 

एकाही कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण नाही

महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने गेल्या वर्षभरापासून एकही रजा न घेता एकही दिवस कामावरची टाळाटाळ न करता ही इतकी वसुली केली आहे. अशी माहिती महानगरपालिका अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली. याचबरोबर ते असेही म्हणाले की सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे अनेक कोरोना काळात नागरिकांमध्ये जाऊन काम करत असताना देखील अतिक्रमण विभागातील एकाही कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झालेली नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज